भिडे गुरुजी रोज कुठे ना कुठे जाऊन देव-देश-धर्म यावर बोलतच असतात, परंतु उच्च अध्यात्मिक पातळीवर जागृत होणारी प्रतिभा शक्ती गेली अनेक वर्षे त्यांचे ठायी अक्षरश: विलसत आहे. त्यांनी स्वत: कधी श्लोक कुठे छापुन आणलेले नाहीत परंतु धारक-यांनीच ते ऐकुन पाठ करून किंवा त्यांच्या कुलूप नसलेल्या खोलीतुन गुपचुप मिळवून जगासमोर आणलेले आहेत! त्यातील आम्हाला जे उपलब्ध झाले ते श्लोक टाकीत आहोत...
महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले
मराठ्याविना राष्ट्र गाडा न चाले
खरा वीरवैरी पराधीनतेचा
महाराष्ट्र आधार उभ्या भारताचा।
(सेनापती बापट य़ांचा हा श्लोक गुरुजी नेहेमी सांगतात)
(सेनापती बापट य़ांचा हा श्लोक गुरुजी नेहेमी सांगतात)
भगवा करांत फडके तव्दत् उरांत ।
चित्तांत बुद्धींत तसाच नसानसांत ।।
ही देहकाठी अवघी भगव्या ध्वजाची ।
सोडू न वाट कधीं हि शिवभूपतींची ।।
पहावे तिथे
दंभ चोरी लबाडी ।
दिसे गांव ते वाटते चोरवाडी ।। धुंडाळुनी शुद्ध व्यक्ती मिळेना । पुरा देश झाला किती हीनवाणा ।।१।।
बघावे तिथे
स्नेह करुणा उन्हाळा ।
अनीती फसवणूक पहावे न डोळा ।। पशूता किती क्रूर थैमान घाली । जनांचा दिसेना कुणी ही न वाली ।।२।।
त्वरे खरकटी
बुद्धी घेती दुजांची ।
स्वयें चाटीती वाट जी परकियांची ।। नसे चाड काही स्वत:च्या कुळाची । करंटी पिढी जन्मली सूकरांची ।।३।।
आहों कोण याची असे शुन्य जाण ।
नसे स्वत्व वा देशधर्माभिमान ।। मरेतो जगुया असा हीन भाव । अशांची असे माऊली मृत्युदेव ।।४।।
बिरूदावल्या
मोठमोठ्या जयांना ।
असे सर्व ज्ञानी फसवती जनांना ।। नसे कोणी विद्वान हा शीलवंत । बका माजी जैसा नसे कोणी संत ।।५।।
सदा बोलती
मोठमोठे विचार ।
कधी ही नसे शोभणारा आचार ।। भल्यांच्या मतीमाजीं वित्ताभिलाषा मुखी कीर्तने आणि आतुन तमाशा ।।६।।
दिसे ते नकोसे
नसे ते हवेसे ।
मनाचे असे नित्य वेडे उसासे ।। खुळ्या या मनाचा त्वरे नाद सोडा । विवेका सवे आप्तसंबंध जोडा ।।७।।
उरी
राष्ट्रनिष्ठा नसे स्वाभिमान ।
अशांचे कसे राष्ट्र होई महान ।। उठा हिंदुजाती करु ध्येयनिष्ठ कराया जगी हिंदुराष्ट्र बलिष्ठ ।।८।।
वधा आळसाला
उठा घाम गाळा ।
सुखासीनता कर्मयोगात जाळा ।। विवेके सदा राबती जे अपार । अशांच्या पुढे काळही वाकणार ।।९।।
सरोवर सदा शोभती अंबुजाने ।
कमळास शोभा हि जलाशयाने ।। गगनास शोभा रविचंद्र देती । भगव्यामुळे शोभते ही धरित्री ।।१०।।
करावे स्वये
ते कधी ना स्मरावे ।
परोपकारार्थ सदा झिजावे ।। कृतज्ञ होऊनी जगी जगावे । परकृत उपकारां नेहमी आठवावे ।।११।।
मौलिक स्वर्ण
असुनी रूची ना सुगंध ।
हत्ती बलिष्ठ असुनी गतिमाजी मंद ।। उड्डाणराज गरूडास न हंसज्ञान । गुणश्रेष्ठ हिन्दु असुनी जगी स्थानहीन ।।१२।।
नसे जाण
त्याला म्हणा प्राणहीन ।
नसे सिंधु तो ज्यास ये ना उधाण ।। न पांग फेडी म्हणा त्या न सुत । करु हिन्दु सारे जगी जातीवंत ।।१३।।
जगा सिंह
म्हणुनी ,नका होऊ श्वान
।
नसावा कधी हिंदु हा हीन दीन ।। त्यजावा न केव्हा स्वदेशाभिमान । धरू या मनी तीव्र धर्माभिमान ।।१४।।
आशंका मनी
कार्य होई न चोख ।
गती खुंटते जेवी चिखलांत चाक ।। कशी शिस्त रहावी जिथे नाही धाक । जगु राष्ट्रकार्यी सदा रोखठोक ।।१५।।
निसरड्यावरी
पाय केव्हा न ठेवा ।
तसा चोर हा सोबतिला नसावा ।। नसावे कधी ईंद्रियांच्या अधीन । हवा कार्यकर्ता सदा सावधान ।।१६।।
मुखे बोलती
मोठ मोठे विचार ।
कृतिशून्य झाले सुशिक्षित फार ।। फुले कागदाची जया ना सुवास । उभी दावणीला जणु वांझ म्हैस ।।१७।।
जननी न टाकु
शकते कधी लेकराला ।
ग्रहमालिका त्यजू शके न कधी रवीला ।। सरीता कधी न बदले उदधी दिशेला हिंदु न सोडु शकतो भगव्या ध्वजाला ।।१८।।
जनांच्या मधे
स्वत्व ना स्वाभिमान ।
मनाने पुरा देश झाला स्मशान ।। उठा निर्मु चित्तीं शिवाजीप्रकाश । जयाने जळे दास्यता बंधपाश ।।१९।।
असे जे दिखाऊ
नसे ते टिकाऊ ।
नका इंद्रधनुला लढाईस घेऊ ।। किती तेरड्याची फुले छान दिसती । दिसा दो मध्ये पूर्ण संपून जाती ।।२०।।
असे ज्यास
इच्छा मिळे मार्ग त्याला ।
विचारु नका वाट केव्हा कुणाला ।। कसा चालसी तु?पुसा आंधळ्याला । स्वयें चालता जो पुसेना कुणाला ।।२१।।
चहु बाजुनी
संकटे घेरताती ।
तरी चालती ताठ ठेवुनी छाती ।। आपत्तीवरी नित्य करितात मात । अशांची शिवाजी असे जन्मजात ।।२२।।
मनी साचतो
वासना केर झाडा ।
आतुनी करा स्वच्छ हा देहवाडा ।। करा दूर नेहमी सुखासीनतेला । तनु सारखे स्नान घाला मनाला ।।२३।।
उरी देव आहे
आम्हा मार्ग दावे ।
तया वाचुनी ना आम्हा अन्य ठावे ।। स्वत:च्या वरी पूर्ण विश्वास ज्यांचा । हरी सहाय्यकर्ता बने नित्य त्यांचा ।।२४।।
समक्षात बोले
स्तुती गोड गोष्टी ।
परोक्षांत चाले मती ऊफराटी ।। अशापासुनी सावध नित्य राहावे । कुणाच्या स्तुतीने कधी ना भुलावे ।।२५।।
स्वत:खाती
मोठ्या सुपाऱ्या त्रिकाळ ।
पुजेसाठी छोट्या जणु कि दुकाळ ।। अशी देवभक्ती असे माणसांची । कुणी जात ही निर्मिली खेकड्यांची ।।२६।।
फुटे पोट इतकी स्वत: केळी खाती ।
परी एक ना गाई वत्सास देती ।। असे गाय माता मुखे बोलताती । तिच्यासाठी साली अशी हीन रीति ।।२७।।
मुळांचा पसारा
जधी खोल खोल ।
तरुंचा अशा वादळी राही तोल ।। जरी तीव्र निष्ठा जनांच्या मनांत । टिके राष्ट्र लढता अरिसंगरात ।।२८।।
शिवसूर्य
चित्ती आमुच्या तळपे अखंड ।
उध्वस्त नष्ट करु हे आम्हि म्लेंच्छबंड ।। हिंदुसमाज घडवूं शतधा ज्वलंत । यवनांत पूर्ण करण्या बनु या कृतांत ।।२९।।
ठगांच्या मुखे
जे मिळे ऐकण्यास ।
तयाला असे खूप मोठा समास ।। नऊ हात ढलपी सहा हात फाळ । अशा बोलण्याला नसे ताळ मेळ ।।३०।।
धनाला नका जीवनमध्य मानू ।
धनाढ्यास वाचे नका व्यर्थ वानूं ।। जयाला जगी द्रव्य वाटेल देव । उरेना तिथे नीतिचे नाव गाव ।।३१।।
कुठे गाय गेली?विचारे कसाई ।
तयाला खरे सांगणे पाप होई ।। जगी संत रक्षावया सत्य सोडा । करावा असा न्यायनीति निवाडा ।।३२।।
जणु काळ
खाण्या आणि भूमिभार ।
अशी माणसे हि किती जन्मणार ।। मिळावा कसा यातुनी कोणी त्राता । अशी मायभूच्या मनीं तीव्र चिंता ।।३३।।
जरी कां कधी
रोग रेड्यास झाला ।
पखालीस लावु नका औषधाला ।। अहि सोडुनी ना बडविणे बिळाला । त्यजा अन्य शत्रु वधा म्लेंच्छतेला ।।३४।।
त्यजा
श्वानवृत्ती बना स्वाभिमानी ।
उठा देश घडवु स्वत:च्या मतींनी ।। त्वरे जाळु या खरकट्या कल्पनांना । नकादर्श मानू कधी परकियांना।।३५।।
धरा शत्रुचा
राग संताप चीड ।
त्यजू दास्यता वाळवी क्षुद्र कीड ।। नको देशदेहावरी शत्रूखुण । जनी निर्मूं या देशधर्माभिमान ।।३६।।
नसे विश्व हे
लहान अथवा महान ।
मती येवढे विश्व आकारमान ।। जयाची जशी बुद्धी चित्अंतरंग । तसे भासते विश्व जे का अथांग ।।३७।।
नसे धार ते
खड्ग ही लोहपट्टी ।
विना खोबरे नारळ हि नरोटी ।। दिशा दृष्टी नाही अशा ह्या जीवांना । उगा माणसे का म्हणावे पशूंना ।।३८।।
दिसे दर्पणी
ते कधी ये न हातां ।
जगी सूख ही पूर्ण फसवी वदंता ।। दिसे स्वप्नी तें द्रव्य लाभेल काय । सुखाच्या स्तवे व्यर्थ हा पाठलाग ।।३९।।
सुखासीनता तेथ
राहे न राम ।
वसे राम तेथे जिथे कष्ट घाम ।। जयांना त्वरें गाठणे ध्येयधाम । अशांनी आरामास द्यावा विराम ।।४०।।
त्यजू
मेंढीवत् जे आयु दीर्घकाळ ।
जगू सिंहवत् हे जिणे अल्पकाळ ।। नको राख होऊनी जगणे असीम । बनू या तडित् जी उजाळेल व्योम ।।४१।।
झडपे जसा ज्योतीवरती पतंग ।
मनाने असे ना आम्ही होऊ व्यंग ।। चितेमाजी काष्टे जशी भस्म होती । विकारासवे आमुची हीच रीती ।।४२।।
नाही मनाहूनि दुजे अति तीक्ष्ण शस्त्र ।
निर्धार युक्त मती हे अति दिव्य अस्त्र ।। हिंदुमनास चढवू शिवभूपधार । हे हिंदुराष्ट्र घडवू आम्ही धारदार ।।४३।।
जिथे लाथ मारु
तिथे काढू पाणी ।
असे हिंदू सारे करू स्वाभिमानी ।। जिथे जाऊ पाहू तिथे जिंकू लोक । जनांच्या मधे निर्मु या राष्ट्रभूक ।।४४।।
जिवाच्यासवे
मृत्यू हि जन्म घेतो ।
सूर्योदयाच्या सह अस्त येतो ।। असे ज्यास आदि तया अंत आहे । भवाची नदी ही अखंडित वाहे ।।४५।।
नसे शील तो सूकराहून हीन ।
तयाचे असे बोलणे श्वानज्ञान ।। अशांना कधी ना जनी स्थान द्यावे । दिवाभीत त्याच्या मुखा ना पहावे ।।४६।।
वरूनी दिसे येकसे आंत अन्य ।
जणु साधू भासे परी वृत्ती वन्य ।। दुरुनी पाहाता जणूं सिंह वाटे । जगीं भासते ते असे सर्व खोटे ।।४७।।
नसे
दुर्गुणवाचूनी शत्रू कोणी ।
अशी जाण ठेवा स्वतः नित्य ध्यानी ।। मिठाचा खडा नासवे सर्व दूध । त्वरे दुर्गुणांचा करा लक्षवेध ।।४८।।
मनाच्या रणीं
जो पराभूत झाला ।
कधी ही जयश्री वरे ना तयाला ।। महावज्र निर्धार ज्यांच्या उरात । यशश्री भरे पाणी त्यांच्या घरात ।।४९।।
जरी राजसत्ता
विरोधात गेली ।
नका वाकवू मान केंव्हा ही खाली ।। जरी का कधी अग्नीची भेट होई । जळे ना कधी स्वर्ण उजळून जाई ।।५०।।
धनाचा त्वरे
मोह सोडा सवंग ।
धरे तो कुणी शील होईल भंग ।। नसे शील तो प्राणी मेल्या समान । जणूं लूथ भरतां जगे शूद्र श्वान ।।५१।।
अभिषेक मंत्र
कित्येक दिप विझले जरी या जगांत।
तळपे कधी न विझता रवी या नभांत ।। निर्मु असंख्य हृदयी शिवसूर्यज्वाला । सर्वस्व देतील स्वयें क्षणी मायभूला ।।१।।
माघार ठावी न कधी आम्ही मातृभक्त ।
राष्ट्रार्थ जीवन जगुं शतधा विरक्त ।। चित्तांत साठवू सदा शिवभूपतीस । काळास जिंकिल असा घडवू स्वदेश ।।२।।
रक्तांत बिंबवू उठा अरिसूडत्वेष ।
त्या वाचुनी न टिकतो कधी हि स्वदेश ।। जाळु गलिच्छ क्लिबवत अवघे विटाळ । राष्ट्रात निर्मु अवघ्या शिवसूर्यजाळ ।।३।।
इतिहास गर्जुनी आम्हा कटू सत्य सांगे ।
ठेचु शकला यवना जरी व्हाल जागे ।। संपूर्ण नाश अरीचा जरि ना कराल । विश्वात राष्ट्र म्हणुनी कधी ना टिकाल ।।४।।
शिवबा कशास्तव कसें जगले स्मरुया ।
शिवभूपमार्ग विजयार्थ उठा धरु या ।। मनिषा अपूर्ण परिपूर्ण करावयास । विजयी रणात करु या भगव्या ध्वजास ।।५।।
राष्ट्रार्थ जीवन जगुं प्रण हा अभंग ।
आपत्ती दुःख भवती असता अथांग ।। सर्वस्व अपर्ण करू आम्ही मायभूस । निर्माल्य जीवन बनो उरी तीव्र ध्यास ।।६।।
आकाशी सूर्य म्हणुनी ऋतुचक्र चाले ।
पाण्यामुळे जगतीं मत्स्य जिवंत ठेले ।। देहात प्राण म्हणुनी आम्ही जीवमान । शिवसूर्य चित्ती धरूनी बनू राष्ट्रवान ।।७।।
राष्ट्रार्थ हाती धरणे ''शिवखड्गधारा" ।
पाळे मुळे समुळही जाळूनी शत्रू मारा ।। वधण्या अभंग धृतीने रणीं म्लेंच्छदैत्य । सिंहासमान जगलें शिवसूर्य नित्य ।।८।।
भगवा करांत धरिला कधींही न सोडू ।
हिन्दुत्वशत्रु सगळे हुडकुनी गाडू ।। शिवसूर्य ध्येय आमुच्या नित काळजात । रणकंदणी फडकवू भगवा जगांत ।।९।।
दीपात तेल नसता न पडे प्रकाश ।
निष्ठा विना न तगडां बनतो स्वदेश ।। हिन्दुसमाज मतीं हृद करण्या स्वतंत्र । शिवबा विना न दुसरा बलशाली मंत्र ।।१०।।
हिन्दूत चेतवू उठा शिवसूर्यजाळ ।
जो जाळ जाळील पूरे अरिम्लेंच्छकुळ ।। ह्या लक्षपूर्ती स्तवही जगणे जयांचे । हे राष्ट्र निर्मु असल्या "शिवशार्दुलांचे" ।।११।।
संभाजीमंत्र तदवत् उरी ज्या शिवाजी ।
मारेल मृत्यूवरही रणीं नित्य बाजी ।। हे हिन्दुराष्ट्र करण्या रवीवत् ज्वलंत । हे बीज मंत्र भिनवू मनशोणितात ।।१२।।
निष्ठा अभंग उरी ठेऊनी मार्ग चाला ।
आव्हान देऊनी उठा नित संकटाला ।। आशिष देईल तुम्हा तुळजाभवानी । जिंका आदेश दिधला शिवभूपतींनी ।।१३।।
देहास मानूनी जगा नित पायपोस ।
झुंजा अखंड करण्या आपुला स्वदेश ।। होऊ नका चूकूर हो हृद्गत कथूनी । संदेश अंतिम दिला शिवभूपतींनी ।।१४।।
कशासाठी आणि जगावें कसे मी ।
विचारू स्वतःला असा प्रश्न नेहमी ।। जगू पांग फेडावया मायभूचे । आम्ही मार्ग चालू जिजाऊसुताचे ।।१५।।
भाग २
मनी एक हेतु मुखी अन्य वाचा ।
स्वभावे जनांचा असा नीच ढाचा ।। सबाह्यांतरी जान्हवी शुद्ध जाणा । (गंगा ) तसे शुद्ध जगता उरी देवराणा ।।१।।
अति झोपती शत्रू जाणा स्वत:चे ।
खरे पाहता शत्रू ते मायभूचे ।। जयाना सुचेना हिताचा विचार । तयांच्या हुनी अश्मही फार थोर ।।२।। (दगड )
मने तोडी तो शब्द जाणा कठोर ।
असंख्यास जोडे असे जो मधूर ।। अहर्नीश ठेवु मनीं एक सार । जगी शब्द आहे दुधारी हत्यार ।।३।।
आता चालणे चालणे हाच मार्ग ।
आम्हा वाटतो मायभू हाची स्वर्ग ।। कधी ना कशाची आम्ही आस केली । हृदी आमुच्या राष्ट्रनिष्ठा उदेली ।।४।।
नको मान सन्मान आम्हास काही ।
जगू मायभूच्यास्तवे हीच ग्वाही ।। त्वरे निर्मू निष्ठा प्रति हिंदुदेही । करू राष्ट्रसेवा बनोनी विदेही ।।५।।
गुरू शोधता शोधता उर फाटे ।
मनासारखा अन्य आहे ना कोठे ।। मनाचे तळी ठाण मांडून राहू । भवाचा निधी पार लंघून जाऊ ।।६।।
जरी बेंदरी बैल भूभूषविले ।
झुली घालुनी खूप श्रृंगार केले ।। पुरेसे मिळेना तया अन्न खाया । वृथा सर्व श्रृंगार जातील वाया ।।७।।
जळी मंथुनी ना मिळे लोणी केंव्हा ।
विना छिद्र वेळू कसा होई पावा ।। असे वांझ महिला कसे मूल व्हावे । नसे चित्तशुद्धी कसा देव पावे ।।८।।
कधी ना कधी देव देईल भेटी ।
तपाने धरावे स्वत:लाच वेठी ।। हरि अन्य नाही स्वत:हून जाणा । वसे सद्गुणांच्यारूपे देवराणा ।।९।।
समुद्रामधे थेंब नाही मधाचा ।
वृकाचे उरी अंश कैसा दयेचा ।। (लांडगा ) कसाई कसासें विना काळजाचा । कृतघ्नता धर्म उपकृतांचा ।।१०।।
विना कर्म करिता वृथा काळ जाणे ।
स्वत:चा स्वत:ने असा खून करणे ।। जगी सर्व काही मिळे हाटी जाता । ( बाजार ) खरेदी मिळे ना कुठे आयु घेता ।।११।।
नसे आत्मविश्वास ज्याचा स्वत:ला ।
उणा राहतो तो जगी करतुतीला ।। हरि आत्मविश्वास देतो मनाला । नका अंतरू अंतरीच्या हरीला ।।१२।।
कधी लागते का रविला विजेरी ।
कधी जान्हवी का हुडके विहिरी ।। न लागे मृगेंद्रा कुणी सोबतीला । चढा जाणुनी हे त्वरे श्रेष्ठतेला ।।१३।।
मार्जार भासती खलू परि ते न व्याघ्र ।
गरूडापरी दिसतसे हर एक गृध्र ।। ( गिधाड ) बगळे वरूनी दिसती जणू काय हंस । दिसती मनुष्य वरूनी परि आंत कंस ।।१४।।
विना गूल काडी कशी पेट घेई ।
कितीही बळाने कुणी घासली ही ।। जयाचे उरी आग नाही स्वत:ची । रवीचे परि काय उजळेल प्राची ।।१५।। ( पूर्व दिशा ) नका नितीतत्वे लिहु पुस्तकात । त्वरे आचरूया स्वयें जीवनात ।। नको धर्मचर्चा वृथा आयु जाई । आचारातुनी धर्म बलवान होई ।।१६।।
मनी स्वार्थ ज्यांच्या पुरा ठासलेला ।
अशानी जगाचा खरा नाश केला ।। जगद् हीत करिता नसे देहभान । असे सर्व ते सूर्य सरिते समान ।।१७।।
मनाहून नाही जगी अन्य दुष्ट ।
करी मानवाला सदा मार्ग भ्रष्ट ।। जिही मित्र केला शमाला घनिष्ट । अशांचे जिणे होतसे सर्व श्रेष्ठ ।।१८।।
अहर्नीश ज्याना हरिभाव स्पर्शे ।
जगी त्यांचियाने दया धर्म वर्षे ।। अशांच्या कुळ्या वाढता धर्म वाढे । तयांच्यामुळे जाहले देव वेडे ।।१९।।
दधी मंथिता सापडे ताक लोणी ।
परि मूल्यता एक माने न कोणी ।। बळिराम बंधु असे माधवाचा । गुणाने उणा राहिला नित्य साचा ।।२०।।
अरि नाश व्हावा असा ध्यास ज्यांना ।
रणी देवता नित्य वरते तयांना ।। करू हिंदु सारे अशा धारणेचे । पुढारी करू राष्ट्र साऱ्या जगाचे ।।२१।।
विना मोल वस्तु कुठे ही मिळेना ।
विना कष्ट शेती कधी ही पिकेना ।। विनाभ्यास ज्ञानी कुणी ही बनेना । विना भक्ति भक्ता हरि भेट दे ना ।।२२।।
जयांच्या मनी भूक नाही गतीची ।
करा कीव त्यांच्या दरिद्री मतीची ।। गतीहीन ते भूवरी भारभूत । तयाना म्हणावे कसे हो जिवंत ।।२३।।
पळीला चवी आमटीची कळेना ।
तसा आंतरात्मा कुणा आकळे ना ।। तया पाहण्या नेत्र नसती समर्थ । मति इंद्रिये सर्वथा तेथ व्यर्थ ।।२४।।
जरी फोडले चक्षु द्वी मांजराचे ।
तरी मार्ग काढी सदा उंदराचे ।। कुणी वस्त्र नेसे जरी देही स्वच्छ । कशी वासना नाश पावे गलिच्छ ।।२५।।
सामर्थ्य देही वसते असते पशुचे ।
दासानुदास बनते क्षणी वासनेचे ।। निष्ठा विवके जपता नित मानसांत । सामर्थ्य दैवी बनते बघता क्षणांत ।।२६।।
स्वत:च्या मुळाने जरी नीर घेई ।
तरी कोणताही तरू पुष्ट होई ।। कुळी पुत्र जन्मे तरी वंश वाढे । कळेना तयाना म्हणा शुद्ध वेडे ।।२७।।
कुठेही दिसो साप ठेचुनी मारा ।
मनी अन्य चर्चेस द्यावा न थारा ।। विषाचे विना कोणता सर्प आहे । वरोनि कसे पाहोनी ओळखावे ।।२८।।
अहि चावता प्राण जातो खचित । (साप)
तया देखता मारणे हे उचित ।। तसे देश शत्रू टिचोनी वधावे । तरी राष्ट्रगाडा यथोचित धावे ।।२९।।
सुगंधा विना पुष्प ही त्याज्य वाटे ।
जयाना नसे शील ते हि करंटे ।। नसे प्राण ती हि कुडी कुचकामी । नसे शील ज्याला मनु तो निकामी ।।३०।।
कृतीच्या मुळाशी असावा विचार ।
जसी शेष आहे वसुचा आधार ।। कृती उक्तीचा मेळ ठेवु नितांत । तरी धर्म नीती वसे या जगात ।।३१।।
अधर्मापुढे मान वाके न ज्यांची ।
तयांच्या पुढे मान झुकते जगाची ।। महामोहि स्पर्शु ज्याना शके ना । 'शिवाजी' तयांची असे जात जाणा ।।३२।।
दिला शब्द पाळू जरी प्राण गेला ।
असे पुत्र हवे आता मायभूला ।। जगू आईसाठी असा ध्यास ज्याना । उठा हाक मारू अशा बांधवांना ।।३३।।
जयांच्या वरी देव आहे प्रसन्न ।
कुणी निंदीता ते न होती विषण्ण ।। जयाना जगी कार्य करणे महान । तयानी जगावे बनोनी लहान ।।३४।।
इतिहास अभ्यास वृत्ती न ज्यांची ।
अधोगती नित्य घडते तयांची ।। असोनी बळे नेत्र झाकुनी चाले । जगी राष्ट्र ते मृत्युपंथेची गेले ।।३५।।
नभी सूर्य धावे तरी पद्म हासे ।।
इतिहास चित्ती तरी राष्ट्र विकसे । जयाना जगी राष्ट्र करणे महान । इतिहास व्हावा तयांची तहान ।।३६।।
उभे बंगले चांगले थाट माट ।
मधे राहती लोक ही धष्ट पुष्ट ।। स्वत:ही धनी सांगती मी बंगल्याचा । यमाला नसे मान्य ही फोल वाचा ।।३७।।
जरी औषधाने घडे रोगनाश ।
टळे ना कशाने इहि मृत्युपाश ।। आटाचटाळू कुणी घेई शाल । तरी शोधुनी मृत्यु त्याला वधेल ।।३८।।
जयांच्या बुडाशी असे अर्थसत्ता ।
तया लाभते मान आणि महत्ता ।। गुणाला नसे मोल काही जगांत । धनाढ्यास देवाहूनी मानतात ।।३९।।
धनाधीश त्या भोवती लोक गोळा ।
अभिलाष चित्ती वरोनी जिव्हाळा ।। बकध्यान चाले गिळायास मीन । त्रिमुर्ती सभोवती जसे चार श्वान ।।४०।।
कुठे देव आहे कुणाला पुसावे ।
कुणाला नसे नाव ना गाव ठावे ।। तरूंच्या मुळ्यानी नीर शोधीत जाती । तशी तीव्र इच्छा तरी देवप्राप्ती ।।४१।।
ढगांची दळे अंबरी धावतात ।
बहू गर्जती थोडके वर्षतात ।। किती जन्मती माणसे या जगांत । क्वचित थोडकी जाणती सांख्य शास्त्र ।।४२।।
केले जरी कलप लावुनी केस काळे ।
तारूण्य त्यातुन कधीतरी का उफाळे ।। फसवून पूर्ण जगतास आणि स्वत:स । लाभेल का कधी कुणा गत यौवनांश ।।४३।।
जरी दोष ध्यानी आले अनेकांचे ।
उच्चारणे योग्य न होई वाचे ।। तया अंतरी पेरूया ध्येयतेला । आपोआप ते पोहचती योग्यतेला ।।४४।।
धरित्री कधी रागवे का कुणाला ।
सहनशीलता तीहुनी ना कुणाला ।। जयाना जगी कार्य करणे महान । तयानीं जगावे धरित्री समान ।।४५।।
विळा भोपळा भेटती एकमेका ।
विळ्याला नसे भेटिने काही धोका ।। विळ्याने बने भोपळाही विदीर्ण । कळे हे न त्याला म्हणा लंबकर्ण ।।४६।। ( गाढव )
स्वार्था विना मनी नसे दुसरा विचार ।
ते क्षुद्र का कधीतरी बनती उदार ।। मार्जार नेत्र मिटुनी बसती बिळाशी । बगळ्यासमान सगळे निजस्वार्थवासी ।।४७।।
पहावे तिथे दंभ बोकाळलासे ।
तयांचे मुळे धर्म ही भ्रष्टलासे ।। जनांची घडे वंचना आणि भ्रांती । चहूबाजुनी कुंपणे शेत खाती ।।४८।।
झगडू अभंग धृतीने अरिच्या कुळ्यांशी ।
चित्तात ठेवुनी सदा शिवभूप साक्षी ।। ठेचुनी हुडकुनी करू अम्ही शत्रू नाश । नि:शस्त्र निर्भय करू अवघा स्वदेश ।।४९।।
कशी वातीवाचुनी तेवेल ज्योती ।
कशी मातीच्या वाचुनी होईल शेती ।। विनाप्राण ना देह राहे जिवंत । विना धर्म ना राष्ट्र होई ज्वलंत।।५०।।
औरंग्याचे मुंडके शिरुन तोडण्याला |
मिळेना म्हणून कापितो कळसाला ॥ विठोजी चव्हाणवत उरीं पेटलेला | मराठा म्हणावे अशा वाघराला ॥
विश्वास संपादण्यास करे कर्मघाई।
संशयाचा असे नित्य हाड वैरी।। असे भीष्मवत् प्रतिज्ञा पाळण्याला। मराठा म्हणावे आशा वाघराला।।
उरीं पेठती टोचती राष्ट्रचिंता ।
विषय चिंतनाचा अखिल हिंदु जनता।। जगे सर्वथा मायऋण फेडण्याला। मराठा म्हणावे आशा वाघराला।।
त्वरे साधण्या हिन्दवी राज्य योग।
सुखासीनतेचा करे पूर्ण त्याग ।। स्वदेहात संताजी संचारलेला । मराठा म्हणावे अशा वाघराला
दिला एकदा शब्द न पालटावा
पुढे टाकला पाय मागे न घ्यावा । धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१।।
आपत्तीतही पाय मागे फिरे ना
महासागरी धैर्य ज्याचे गळे ना मिळवितो रणी म्लेंच्छसेना धुळीला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२।।
कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती
रणी झेलतो सिंहसा छातीवरती हकारूनी आव्हानतो जो यमाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३।।
जरी शत्रूकांता प्रसंगी दिसेल
तिला साडीचोळी निशी पाठविल कधी स्वप्नी न पाप स्पर्शे मनाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४।।
महावादळांच्या विरोधात ठाके
पुढे संकटांच्या कधीही न वाके पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५।।
धरू खडगधारा वधू शत्रू पूर्ण
करू म्लेंच्छसत्ता बळाने विदीर्ण क्षुधा तहान ऐसी ज्याच्या उराला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६।।
विना शस्त्र सिंहासवे झुंजणारा
मुखातील जिव्हा बळे तोडणारा अलंकार ज्याचे करी खडग् भाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।७।।
मनी धर्मनिष्ठा तशी राष्ट्रनिष्ठा
उरी देवनिष्ठा तशी शीलनिष्ठा सदा कर्मयोगी स्मरे जो ध्रुवाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।८।।
मऊ मेणवत बोलण्या वागण्यात
परी फोडतो वज्र ही तत् क्षणात गवसणी धजे घालण्याला नभाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।९।।
नसे किर्तीकांक्षी , धनाचा न दास
उरी पेटतो हिंदवीराज्य ध्यास विसरतो क्षणी देशकार्यी स्वतःला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१०।।
सहस्रावधी शत्रू दिसता समोर
तरीही खचे ना उरातील धीर उफाळूनी धावे अरी मारण्याला मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।११।।
असे मांड घोड्यावरी नित्य घट्ट
पवनपुत्रसा गाठतो शत्रू थेट रणी अर्पितो म्लेंच्छसेना धुळीला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१२।।
असे देह तगडा चिवट ताठ बळकट
उभट रुंद छाती ग्रीवा घट्ट मनगट फडामाजी कुस्ती करे तत्क्षणाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१३।।
वसे धैर्यलक्ष्मी अखंडित चित्ती
करे झुंजूनी शत्रूसेना समाप्ती भिती स्पर्शते ना कधी अंतराला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१४।।
सदा संतचरणी त्वरे ठेवी माथा
वधे देवद्रोही स्वये म्लेंच्छकुत्ता करे द्वंद्व आव्हान जो म्लेंच्छतेला मराठा म्हणावे अशा वाघराला।। १५।।
खडे सैन्य घेई अटकपार जाई
जिथे म्लेंच्छ भेटे तिथे सूड घेई सदा धाव ज्याची असे उत्तरेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१६।।
महा साहसेची महा धैर्यतेची
महा कर्तृत्वाची महा शूरतेची त्वरे देणगी मागतो जो हरीला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१७।।
सुधांशूस पाहता उफाळे समुद्र
अफजल्यास पाहता शिवरायरक्त पाहताच संतापतो पाकड्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१८।।
झुके ना कधी संकटांच्या समोर
रणी खंडते ना कधी खडगधार हरीची कृपा मानितो संकटाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।१९।।
करे भगव्या झेंड्यासवे पूर्ण वारी
तसा म्लेंछनाशार्थ करणार स्वारी उभयतां मध्ये भेद वाटे न ज्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२०।।
रणी धाव घेता असे खडगहस्त
विठू वारीसाठी असे टाळ हस्त अलंकार दोन्ही करी टाळ भाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२१।।
फुलाजी प्रभू आणि बाजी प्रभुंना
तसा चित्ती ध्यातो शिवा काशीदांना सदा सिद्ध त्रयीवत् तनू झोकण्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२२।।
रणी धर्म रक्षावया झुंजणारा
टिचुनी स्वये शत्रूंना मारणारा म्हणे धर्म रक्षावया जन्म झाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२३।।
नदी सागराच्या कडे धाव घेई
सुगंधाकडे भृंग ही झेप घेई तसा धावतो शत्रू निर्दाळण्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२४।।
धनाच्या रुपाच्याहूनी मानी शील
खलाच्या पुढे ना कधी ही झुकेल त्यजे स्वाभिमानार्थ ही जीवनाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२५।।
भरारी गरुडाची बुद्धी कृतीत
अभयता वनेंद्राची ही अंतरात असे राजहंसवत कृती बोलण्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२६।।
दमे ना थके ना झुके ना हटे ना
कधी हिंदवी राज्यमार्गी ढळे ना निराशा न स्पर्शे कधीही उराला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२७।।
विषाच्याहूनी ही कडू जो अमाप
तसा अमृताच्याहूनी गोड खूप सहोदरचि शोभे नभी भास्कराला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२८।।
विपत्तीतही चित्त ज्याचे ढळे ना
रणी झुंजता पाठ मागे वळे ना भवानी पदी पूर्णतः वाहिलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।२९।।
मरण की शरण हा जधी प्रश्न ठाके
स्वधर्मास्तावे जो सहज देह त्यागे उरी सूर्य आदर्श संभाजी ठेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३०।।
जगी रंजले गांजले कोणी प्राणी
निवारी तयांची त्वरे दुःख खाणी कुणाच्याही दुःखावरी घाली घाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३१।।
म्हणे बाप माझा असे पंढरीत
आई राहते नित्य तुळजापुरात तयां दर्शनासाठी आतुरलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३२।।
कुणी निंदती देश धर्मास दुष्ट
अशांना झटे पूर्ण करण्यास नष्ट असे आर्तता धर्मसंस्थापण्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३३।।
जरी व्याघ्रसा सिंहसा देहभाव
परी अंतरी आर्तसा भक्तिभाव सदा देश धर्मार्थ आसुसलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३४।।
मनी जागृती स्वप्नी ही राष्ट्रचिंता
झटे निर्मिण्या हिंदवीराज्य सत्ता शिवाजी आकांक्षांस्तवे जन्म झाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३५।।
स्मरे श्वास घेता जिजाऊसुताला
उरी आठवितो सईच्या सुताला समजतो तृणासारिखे जो जिण्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३६।।
असे जान्हवीवत सदा शुद्ध चित्त
तसा शारदापुत्रवत जो प्रबुद्ध पदी मारुतीवत असे जो गतीला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३७।।
उताराकडे वाहते नित्य पाणी
विकाराकडे धावती सर्व प्राणी नसे तोड ज्याच्या जगी संघर्षाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३८।।
सुखासीनतेचा असे हाडवैरी
अथक कर्मयोगात घेई भरारी रवी जान्हवीच्या कुळी जन्मलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।३९।।
रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले
कटू सत्य हे चित्ती ज्याच्या उमगले तदर्थी धरी बंदूक खडग भाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४०।।
क्लिबांचीअहिंसा तसे ब्रम्हचर्य
स्वधर्मा स्वदेशास्तवे नष्टचर्य लाथाडतो थुंकतो गांधीतेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४१ ।।
कुणी क्रूर भेटे बने लक्ष क्रूर
त्वरे मारतो पोट फाडूनी ठार शिवाजी जसे फाडती अफजल्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४२।।
आधी कोंढाण्याचे लगीन लावण्याला
मुलाचे त्यजून धाव घेई गडाला स्वतःच्याहूनी मायभू श्रेष्ठ ज्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४३।।
भले शत्रूची माय कांता बहीण
तिला मानतो जन्मतः माय बहीण अशी धर्मश्रद्धा उरी बाणलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४४।।
असे सर्वसाक्षी पुऱ्या संस्कृतीचा
खरा प्राण आत्मा उभ्या भारताचा न सोडी अशा दिव्य भगव्या ध्वजाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४५।।
शिके गर्भावासात झुंजाररीत
लगीन खडगसंगे पडे उदरात वधाया सदा सिद्ध म्लेंच्छासुराला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४६।।
नभी ज्या क्षणी होतसे गडगडाट
वनी तत्क्षणी डरकाळे सिंहनाद तसा डरकाळून मारितो दुश्मनाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४७।।
स्वधर्मावरी करता कोणी आघात
तसा मायभूला करे कोणी घात भिडे आग पायातली मस्तकाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।४८।।
लगीन रायबाच्या आधी कोंढाण्याचे
कराया गडी प्राण देतो स्वतःचे नरव्याघ्र तानाजी आदर्श ज्याला मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।४९।।
शिवा काशीदांचा असामान्य त्याग
मला ही असा लाभूदे कर्मयोग असे मागतो नित्य तुळजपदाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५०।।
जगावे शिवाजी सुटावे जिवंत
स्वये बैसतो मृत्यूच्या पालखीत शिवा काशीदांच्या धरे जो पथाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५१।।
निखाऱ्यातूनी हासत चालणारा
विना ढाल शत्रूसवे झुंजणारा भितो मृत्यू ही स्पर्श करण्या जयाला मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।५२।।
तृषा भागवितो पिऊनी तृषेला
क्षुधा भक्षुनी संपवितो क्षुधेला तिन्ही ईषणाही पराभूत केला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५३।।
कृती उक्तीमाजी असे एकरूप
वचनपूर्ततेच्या विना घे न झोप जगी धर्म मानी वचन पाळण्याला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५४।।
जसा कर्मयोगी तसा ज्ञानवंत
जरी भक्तियोगी मनाने ज्वलंत जिणे मायभूमीपदी अर्पिलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५५।।
पुरा ठार मारावया शाहिस्त्याला
घुसुनी लालमहाली करे खड्गहल्ला भीती स्वप्नी ना स्पर्शते काळजाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५६।।
स्वयंस्फूर्त उत्साही जो धैर्यशील
मनाने नभासारखा ही विशाल कृती उक्तीने पाळतो सत्यतेला मराठा म्हणावे अश्या वाघराला ।।५७।।
घणाघात घालू मुघलतख्त फोडू
पुरे जाळुनी राख पाताळी गाडू अटकपार दौडण्यास आसुसलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५८।।
मनी खदखदे म्लेंच्छ संताप चिड
आतुर घ्यावया शत्रूचा पूर्ण सूड सदा म्लेंच्छनाशार्थ आसुसलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।५९।।
नसे शत्रूसुडाहूनी श्रेष्ठ धर्म
घडे धर्मरक्षण जरी जाण मर्म रणी देश रक्षण्यासही वाहिलेला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६०।।
सुखाच्या स्तवे जो न लाचार श्वान
उरी धमणी ठोक्यास्तवे राष्ट्रध्यान सदा चित्ती ध्यातो वढू रायगडाला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६१।।
वसे रोमरोमी स्वधर्माभिमान
चले श्वास श्वास शिवबासमान जिणे अर्पिले पूर्णतः मायभूला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६२।।
कुणी वीट मारे दगड हेच उत्तर
दगड कोणी मारे तडक गोळी उत्तर स्वये होई वणवा गिळाया आगीला मराठा म्हणावे अशा वाघराला ।।६३।।
सुखासीनता पूर्णतः घातकारी ।
मने भयकुनी लोक होती विकारी ।। जगी लोक जे इंद्रियांच्या अधीन । अशांच्यामुळे मायभू होई क्षीण ।।१।।
आहे का कुणी भोवताली उपाशी ।
स्वतः जेवताना विचारा मनाशी ।। नसावे कधीही मनाने अधाशी । असे आत्मनाते असावे जगाशी ।।२।।
अलंकार वस्त्रे तनू भूषविती ।
तनुप्राणशक्ती न ते वाढविती ।। विना राष्ट्रनिष्ठा असे जो विकास । तयाने पुरा देश होई भकास ।।३।।
जगावे कधी ना स्वतःच्या सुखार्थ ।
जिणे धन्य ते जे जगाच्या हितार्थ ।। तरु वेली गाई नद्या चंद्र सूर्य । उरी साठवू या जगाचा आदर्श ।।४।।
पेराल ते उगवते,खलु विश्वसत्य ।
मातेनुसार उपजे उदरी अपत्य ।। इच्छा तशी फळे मिळतात जाणा । हे जाणुनी धरू उठा शिवसूर्यबाणा ।।५।।
पुठ्ठा न रक्षु शकतो कधी ग्रंथज्ञान ।
पदशक्ती वाढू न शके जरी पायी वाहाण ।। सर्वांस प्राप्त जरी हि गृहवस्त्र अन्न । निष्ठा विना न बनते जगी राष्ट्र महान ।।६।।
नको नीती तत्वे लिहू पुस्तकात ।
त्वरे आचरावी स्वतः जीवनात ।। नको नीतिचर्चा वृथा आयु जाई । आचारातुनी धर्म बलवान होई ।।७।।
नसे इंग्रजी दूध हे वाघिणीचे ।
खरे पाहता विष ते दास्यचेचे ।। असे देववाणी झरा अमृताचा । पिऊनी बने देश मृत्यूंजयांचा ।।८।।
कशी वाती वाचून तेवेल ज्योती ।
कशी माती वाचून होईल शेती ।। विना प्राण ना देह राहे जिवंत । विना धर्म ना देश होई ज्वलंत ।।९।।
नसे ज्या मनी देश धर्माभिमान ।
असे सर्व ते या जगी शूद्र श्वान ।। धन्याशी असे श्वानही एकनिष्ठ । असे शिक्षितांच्याहूनी श्वान श्रेष्ठ ।।१०।।
किती हि जरी सत्य हे श्रेष्ठ जाणा ।
विना शक्ती ते बोंब मारी ठणाणा ।। किती हि जरी गाय जरी क्षीरशाली । तिला पाहिजे रक्षण्या कोणी वाली ।।११।।
जिभे सारखे नाही कोणी खट्याळ ।
जिला जन्मतः वासनेचा विटाळ ।। जरी ती बसे बत्तीशी पिंजऱ्यात । फसवते कुणाला हि बघता क्षणांत ।।१२।।
जधी सिंह होई नखे दंतहीन ।
तया मारते फाडूनी शूद्र श्वान ।। उठा हिंदूंनो! सत्य जाणा त्रिकाल । टिकाया जगी शक्ती मिळवा कराल ।।१३।।
विना देव देवालयाला न अर्थ ।
विना ध्येय ते हि जिणे शुष्क व्यर्थ जया चित्ती ना देशधर्माभिमान । तयांचे गणावे न मनुजांत स्थान ।।१४।।
विषाचे विना कां विषाच्या सहित ।
असा भेद मुंगूस नाणी मनांत ।। दिसे त्या क्षणी मारितो पन्नगास । ( नाग) वधा म्लेंच्छ हे सत्य सांगे जनास ।।१५।।
कितीही जरी द्रव्य लाभे कुणाला ।
परी तृप्तता वाटते ना मनाला ।। तृषा सागराची कधी मावळेल । तशी मानवाची धनाशा त्रिकाल ।।१६।।
आम्ही वीतरागी बनू कर्मयोगी ।
तनाने मनाने बनू या निरोगी ।। मनाने पुरा देश विकलांग रोगी । करू या त्वरे राष्ट्र शिवभूपयोगी ।।१७।।
लढाऊ चढाऊ करू हिंदुजाती ।
धृतीने करू म्लेंच्छ जातीसमाप्ती ।। अरीनाश ना ध्यास ज्याच्या मनांत । कळे हे न तें, राष्ट्र जाई लयास ।।१८।।
अलंकार देहास शृंगारण्याला ।
कशाला हवे ते असे शील ज्याला ।। फुलांच्या सवें वेली शोभे नितांत । शीला सारखा दागिना ना जगात ।।१९।।
विना वासनाअंत ना कोणी संत ।
जया देहबुद्धी म्हणा भोगजंत ।। रवीवत् जगे जो जगाच्या हितार्थ । तया संत हे नाव शोभे यथार्थ ।।२०।।
विवेके त्यजू मोह आसक्ती दोन्ही ।
उरी चेतवु ज्ञानवैराग्यवन्ही । मतीला हवे 'नीतीनेतृत्व' नित्य ।। तरी धर्म वाढे, टिके न्याय सत्य ।।२१।।
सुखाच्या सदा पाठलागात मग्न ।
असे सर्व प्राणी मनामाजी भग्न ।। सुखा एवढी भ्रांती नाही जगांत । फसावे न केव्हा मृगाच्या जळात ।।२२।।
निसरड्यावरी पाय पडता पडाल ।
तसे कांचनाच्या मृगाने फसाल ।। मनी मोह शेवाळ साचू न द्यावे । तपाच्या जळाने मनाला धुवावे ।।२३।।
स्तुतीने कधीही न हुरूळूनी जावे ।
टिकेने मनी ना कधी क्षुब्ध व्हावे ।। पयाने जलाब्धी, ढगाने गभस्ती । ( समुद्र , सूर्य ) स्वभावे कधी ना विकारीत होती ।।२४।।
असू वा नसु स्वामी आम्ही जगावे ।
बनू या त्वरे स्वामी आपुल्या मनाचे ।। जगी जो कुणी जिंकू शकतो मनाला । अति लीलया जिंकू शकतो जगाला ।।२५।।
शोभायमान करतील,न रक्षतील ।
मिळे तो वरी,पेरू हि भक्षतील ।। अशा पोपटा सारिखे लोक झाले । अशांच्या मुळे राष्ट्र मातीत गेले ।।२६।।
स्वतःची फळे ना कधी वृक्ष खाती ।
नद्या ना स्वतःचे कधी पाणी पीती ।। फळाला त्यजूनी करू कार्य नेहमी । जिणे अर्पूनी रक्षुया मातृभूमी ।।२७।।
किती हि जरी क्रोध आला मनांत ।
नका व्यक्तवू बोलण्या वागण्यात ।। दहा अंक मोजा गिळा राग पूर्ण । उजाळा मनी संयमे शांतीस्वर्ण ।।२८।।
मना एवढा ना उकिरडा जगांत ।
नको ते असे सर्व त्याच्या कुशीत ।। त्वरे पेटवू ज्ञानअग्नी उरात । कराया उकिरडा त्वरे भस्मसात ।।२९।।
म्हशीचे रुचीचे नसे काही नाते ।
जसे गानशास्त्रास जाणे न जाते ।। गुळाची जशी गोडी ना गर्दभास । (गाढव ) निधर्मी न जाणे तसा हिंदुतेस ।।३०।।
कसे श्वाननेतृत्व मानील सिंह ।
तसे मानता तो घडे आत्मद्रोह ।। तमाच्या कडे सूर्य मागे न भीक । आम्ही हिंदू हा चित्ती ठेवू विवेक ।।३१।।
सुखाला त्वरे देऊनि सोडचिठ्ठी ।
धरू मुंगीवत् राष्ट्रकार्यी चिकाटी ।। झिजु चंदनासारिखे रात्रदिन । जगू हिंदुराष्ट्रास करण्या महान ।।३२।।
धरु शत्रूता दुर्गुणांशी सदैव ।
करू सद्गुणांशी त्वरे सोयरीक ।। त्यजू घातकारी मताला पथाला । झुगारु विषाला, पिऊ अमृताला ।।३३।।
कणभर मीठ पडता दूध संपूर्ण नासे ।
गृहकलह जधी होई,फिरती गेहवासे ।। खचित जलसमाधी,घेई सच्छिद्र नाव । किलमिष मनी येता,संपतो बंधुभाव ।।३४।।
क्षणा एवढे मौलीक काही नाही ।
कळे हे न त्यांचे जिणे व्यर्थ जाई। । विनाकर्म क्षण हि नका जाऊं देऊ । उठा पूर्ण आयुष्य राष्ट्रास वाहू ।।३५।।
कसें लांडगे शेळी सांभाळतील ।
कसाई कधीं गाय ना रक्षतील ।। कशी मांजरे उंदरे पाळतील । पुढारी तसे देश ना तारतील ।।३६।।
जगीं गंध जन्मे फुलांच्या कुशीत ।
तशी करतुकी जन्मते तळमळीत ।। जिथे मंत्र शिवबा वसे खोल चित्ती । तिथे जन्मते देशभक्ती विरक्ती ।।३७।।
म्हणे जो हवा थोडकासा विसावा ।
असा कार्यकर्ता कधी हि नसावा ।। नका देही केंव्हा अणुमात्र थकवा । रवि त्यास्तवे चित्ती आदर्श ठेवा ।।३८।।
कधी चावते श्वान ना भुंकणारे ।
तसे वर्षती मेघ ना गर्जणारे ।। तनूदास ते ना रणीं धाव घेती । सुशिक्षित सारे कृतीवांझ असती ।।३९।।
बैलास कडबा धन्यासाठी ज्वारी ।
अशी मानवी वृत्ती आहे अघोरी ।। अति कष्ट त्याला मिळे अल्प मोल । जगी 'न्याय' हि सर्वथा शुद्ध भूल ।।४०।।
सदा नाग बळकावितो वारुळाला ।
तसे श्वान ताणून मारे सश्याला ।। जगी न्याय वागे बळींच्या कलाने । बने नीती दासी लवे आर्जवाने ।।४१।।
इतिहास वाचू विचारू स्वतःला ।
कसा ऱ्हास आणि किती नाश झाला ।। उठा हिंदूंनो! संपवू आत्मघात । "शिवाजी" स्मरु मंत्र नेहमी उरात ।।४२।।
जरी माजला बोकड मार्गी आला ।
नका ठोकरू घाबरू व्यर्थ त्याला ।। तया टाळूनिया त्वरे मार्ग चाला । पुढे संधी साधुनी कापा तयाला ।।४३।।
जरी का पराभूत झाला रणात ।
तरी ना खचावे कधी हि मनात ।। किती हि जरी संकटे घेरतील । स्मरु या उरी नित्य शिवसूर्यशील ।।४४।।
गरुडा गिधाडा मध्ये स्पष्ट भेद ।
जया सूक्ष्म दृष्टी तया होई बोध ।। बगळे तशीच बदके नसतात हंस । कुणी हि कवि ना जसा कालिदास ।।४५।।
मिळे राहवया खावया पंजरात ।
कसा सिंह राजी असे सर्कशीत ।। जरी स्वत्व स्वातंत्र्य ना जीवनात । जगावे न केंव्हा कुणी या जगात ।।४६।।
रुचीहीन लागे मिठावीण अन्न ।
नसे ध्येय ते हि जिणे अर्थहीन ।। विना नेत्र तो व्याघ्र पडतो दरीत । स्मरा सत्य हे नित्य आपुल्या उरात ।।४७।।
मनी वासनांचा असे जो आसक्त ।
शके का बनू पूर्णतः देशभक्त ।। बुडाला असे भोक हा स्पष्ट धोका । अशी नाव कैसी बने युद्धनौका ।।४८।।
कसा कोंबडीपोटी जन्मे गरुड I
कसा भ्याड प्राणी करे घोडदौड ।। ययाति कसा होऊ शकतो विरक्त । मुसलमान तैसा नसे देशभक्त ।।४९।।
असे काळ खाण्यास धरणीस भार ।
खूपे ऐकता राष्ट्रभक्तीविचार ।। तनू एवढी उंची ज्यांच्या मनाची । अशी हीन जाती असे शिक्षितांची ।।५०।।
निवडुंग हलव्यास फणसास काटे ।
तिहींच्या उरी गोडवा नित्य दाटे ।। मुखी शिक्षितांच्या असे गोड वाणी । परी अंतरी कंटकांच्याच खाणी ।।५१।।
भाग 1
पथी चालता वाट केंव्हा न पहावी ।
कुणा सोबतीची अपेक्षा नसावी ।। खरा मित्र आहे नभी धावतो तो । हृदी अंतरात्मा बनोनी राहतो।।१।।
आम्हा ऐक देवा नको अन्य काही ।
कृपाछत्र राहो तुझे नित्य डोई ।। हृदी भक्ती देई तनी कर्म शक्ती । आणि अंतरामाजी आत्मप्रचिती ।।२।।
आम्हा अंतरात्मा हाकारूनी सांगे ।
उठा मार्ग चाला नका पाहू मागे ।। उभा पाठिशी श्रीहरि संकटात । असे वज्रनिर्धार ज्यांच्या उरात ।।३।।
जिथे देव नाही असे स्थान सांगा ।
हिमाद्री कसासे विना मायगंगा ।। पुढे पाठीमागे वरी खाली नित्य । तया वाचुनी विश्वी काही न सत्य ।।४।।
जिथे क्षारभूमी नका बीज पेरू ।
बसायास घेवु नका अंध वारू ।। नसे चित्त थाऱ्यावरी श्रोतयांचे । वृथा कष्ट घेऊ नका बोलण्याचे ।।५।।
पशु माणसाच्यामधे काय भेद ।
तयासाठी केंव्हा करावा न वाद ।। नसे पुच्छ मनुजा कमी दोन पाद । उभयतांमध्ये अन्य काही न भेद ।।६।।
नका तुच्छ लेखू अहिच्या बळाला ।
सदा नीरखावे त्याच्या गतीला। । नका संधी सोडू तया ठेचण्याची । असे वाट ही राष्ट्र राखावयाची ।।७।।
विचारी मनाला तनु ही कशाला ।
दिली विठ्ठले का उगा नासण्याला ।। जगी चंदनानी वृथा का कुजावे । झिजोनी जगाला सुगंधास द्यावे ।।८।।
आम्ही ध्येयमार्गी कसे थांबू कोठे।
पथी थांबती चालता ते करंटे ।। कधी थांबली जान्हवी वाहताना । तसा भानू सांगा नभी धावताना ।।९।।
अहि का कधी स्पर्शतो मुंगूसाला ।
तसा मोह जाणा आम्हा जीवनाला ।। तमाने कधि का रवि ग्रासियेला । शमाच्या पुढे मोह निष्प्राण झाला ।।१०।।
जळावीन मासा नसे जीवमान ।
तसे आम्ही मातेविना प्राणहीन ।। असो जागृती स्वप्नी हि वा सुषुप्ती । अहोरात्र हा मायभू ध्यास चित्ती ।।११।।
उरी ध्येयज्वाला असे पेटलेली ।
अशांना करी लागती ना मशाली ।। रवी नित्य तेवे विना तेलवात । अशांची 'शिवाजी' असे जन्मजात ।।१२।।
नका रंग पाहू बघा अंतरंग ।
बकाचे असे ध्यान हे शुद्ध ढोंग ।। जरी कस्तुरीचे असे रूप काळे । परी अंतरी सौरभाचे उमाळे ।।१३।।
जया अंगी शक्ती तया मान सत्ता।
जगी शक्तीहीना कटी नित्य लत्ता ।। पहा भेकरे भक्ष्य झाली वृकांची । ( लांडगा ) सदा भोगतो सिंह सत्ता वनाची ।।१४।।
वृथा का करा खंत गेल्या आयुची ।
करा काळजी राहिल्या जीवनाची ।। जसा बाण मागे फिरोनि न येई । असे जाणूनिया करू कर्मघाई ।।१५।।
मनाच्या मुळाशी खरा सर्व गुंता ।
कळेना भल्या बुद्धिच्याही महंता ।। नभाची किती उंची ते आकळेना । मनाला किती सुरकुत्या ते कळेना ।।१६।।
मना सारखा शत्रु नाही कुणीही ।
सदा वास ज्याचा असे मर्त्य देही ।। पराभूत त्याला करावे तपाने । असे सांगतो धर्म मोठ्या रवाने ।।१७।।
नदीला कुठे थांबणे मान्य नाही ।
रवीला कधी झोपता येत नाही ।। जगाच्यास्तवे जन्म झाला जयांचा । तयाना नसे खास विश्राम साचा ।। १८।।
नका धीर सोडू विपत्तीत केव्हा ।
स्मरा सिंहवृत्ती मनामाजी तेव्हा ।। जरी घेरला तो तरी झुंज घेई । समस्तांसी मारोनी जिंकोनी जाई ।।१९।।
समुद्रामध्ये जो प्रवासा निघाला ।
कसा निंदीतो तो तया क्षारतेला ।। विना जीन घोड्यावरी बैसणार । तयाच्या बुडाला कणा टोचणार ।।२०।।
कुठे देव आहे कुणा नाही ठावा ।
कळेना स्वत:ला कसा शोध घ्यावा ।। दुधज्ञान जैसे नसे गोचिडांना । हरिज्ञान तैसे नसे मानवाना ।।२१।।
महामंत्र आहे नव्हे शब्द साधा ।
जयाच्या स्मृतीने जळे म्लेंच्छबाधा ।। नुरे देश अवघा जयाचे अभावी । 'शिवाजी' जपू राष्ट्रमंत्र प्रभावी ।।२२।।
त्वरेने चला गाठूया ध्येयधाम ।
तयावाचुनी घेवुया ना विराम ।। स्मृती अंतरी ठेवुया पूर्वजांची । स्मरू कृष्ण आणि मनी सव्यासाची ।।२३।।( अर्जुन )
समुद्रास तीव्रा पिपासा जलाची ।
तशी आमुच्या अंतरी माणसांची ।। मधुमक्षिका आणि भुंग्या समान । जगूया तसे राष्ट्र करण्या महान ।।२४।।
जगी पूर्ण एकांत कोठे असावा ।
असा शोध घेता कुणी ही फसावा ।। जधी वासनावादळे होती शांत । नसे तो कुठे हि असे अंतरात ।।२५।।
जया तहान नाही जया भूक नाही ।
असा प्राणी सांगा जगी या कुणीही ।। जया अंतरी तेवते मातृभक्ती । तया आडवे का कशाची आसक्ती ।।२६।।
कुणापाशीही याचना का करावी ।
स्वत:ची स्वये वंचना थांबवावी ।। दिले सर्व राहत्या हृदी श्रीहरिने ।। तयाला करू अर्चना तीव्रतेने ।।२७।।
जगाला नको शिस्त लावा स्वत:ला ।
नका ज्ञान सांगु कधीही कुणाला ।। सुधारा स्वत:ला धरा पुण्य मार्ग । अशाने धरेच्या वरी येई स्वर्ग ।।२८।।
जगा दुध पाजा परि ना अहिला ।
सदा सत्य बोला परि ना खलाला ।। जगी सर्व प्राण्यांमधे आत्मतत्व । अहि-शत्रुचे रक्षिणे ना जिवित्व ।।२९।।
बळाच्या विना सत्य नष्टांश थोटे ।
बळाच्यामुळे अनृता स्थान मोठे ।। (असत्य ) बनाया जगी हिंदु संज्ञा यथार्थ । उठा करूया हिंदुराष्ट्रा समर्थ ।।३०।।
कृती उक्तीचा थेट संबंध ठेवा ।
सुई मागूती सूत्र जैसा रिघावा ।। जसे आम्ही बोलू तसे नित्य चालू । तरी लीलया धर्मकार्यास पेलू ।।३१।।
नभा खालती सर्वच्या सर्व ठेंगू ।
कृतांता पुढे मानवी बुद्धी पंगू ।। करू मात मृत्यूवरी कर्मयोगे । भवाचा निधी लंघुया ज्ञानयोगे ।।३२।।
नसे भाव पोटी वृथा शब्द ओठीं ।
कशाला जगा सांगता ज्ञानगोष्टी ।। मनी कोरडे ते पुरे दंभबाज । असे शील त्याला नको स्वर्णसाज ।।३३।।
कधी ना जलाचे नद्या मूल्य घेती ।
द्युती चंद्रभानू विना शुल्क देती ।। लता वृक्ष देती फुलांना फळांना । कसे हे कळेना जगी मानवाना ।।३४।।
करे अल्पज्ञानी बहु बडबडाट ।
जसा निर्झरांचा अति खळखळाट ।। असे पूर्णज्ञानी कमी बोलणारा । विना नाद वाहे जशी गंगधारा ।।३५।।
जरी पेटले विश्व हे वासनेने ।
आम्ही मार्ग चालू अति संयमाने ।। जगी पद्मपत्रास चिकटे न पाणी । जळे ना कधी स्वर्ण उजळे आगीनी ।।३६।।
रणी देश रक्षावया झुंज देऊ ।
करी धर्मसंस्थापण्या शस्त्र घेवु ।। अरिच्या कुळ्या जाळुनिया अशेष । जगाचा पिता हा करू हिंदुदेश ।।३७।।
दिले जे हरिने अति तातडीने ।
चला अर्पुया मायभूला त्वरेने ।। तनाने धनाने तसे जाणिवेने । उभारू चला हिंदुराष्ट्रा गतीने ।।३८।।
पायातले दगड ना कधी दृष्यमान ।
कळसाहुनी नच कुणा अति उच्चस्थान ।। हे राष्ट्रमंदिर चला उभवू गतीने । मात्र्यर्थ त्याग करूनी विरू या धृतीने ।।३९।। ( आई साठी )
विवेका विना पाय पुढती न टाका ।
असा जीवनाचा धरा नित्य ठेका ।। विकारामुळे दृष्टी ज्यांची न अंध । अशांशी धरावा जनी स्नेहबंध ।।४०।।
नदी सागराचे मुला माऊलीचे ।
तसे आत्मनाते आम्हा मायभूचे ।। शशी अमृताची चकोरास भूक । आम्हां मातृभक्ती असे वेड एक ।।४१।।
पुढे टाकला पाय मागे न घेऊ ।
दिला एकदा शब्द केंव्हा न फिरवू ।। ध्वजा घेतली ती कधीही न सोडू । आम्ही मायभूचे रणी पांग फेडू ।।४२।।
रणी जिंकणे शत्रूला फार सोपे ।
मनाच्या पुढे पालथे सर्व बापे ।। बनू स्वामी जेंव्हा स्वत:च्या मनाचे । उजाळू शकू भाग्य अवघ्या जगाचे ।।४३।।
उजळावयास नित्य लागे जळावे ।
विना गाडता बीज का अंकुरावे ।। अतीतातूनी काही आम्ही शिकावे । झिजोनी स्वये राष्ट्र हे उद्धरावे ।।४४।।
अरि मारणे आद्य कर्तव्य जाणा ।
कळेना तया काळ हाणी वाहाणा ।। जयाना जगी राष्ट्र वाटे टिकावे । तयानी सदा कृष्णपंथेची जावे ।।४५।।
कशासाठी वेलीतरुफूल घ्यावे ।
स्वत: जीवनाच्या फुलानी पुजावे ।। असंख्यात पुष्पे हवी पूजनाला । म्हणा अर्पिला देह हा मायभूला ।।४६।।
अति कष्ट झाले तरी ना त्यजावे ।
करी घेतले कार्य सिद्धीस न्यावे ।। मनी संकटाची क्षिती ना धरावी । उरी तेवती ध्येयनिष्ठा असावी ।।४७।।
कुठे जायचे ते जया नाही ठावे ।
प्रवासास त्याने कशाला निघावे ।। इथे राहुनी काय करणे?न ठावे । अशानी जगी जन्मुनी का जगावे ।।४८।।
कधी वासनेचे नका होऊ दास ।
रहा संयमाने मनस्वी उदास ।। जगी जे कुणी वासनादास झाले । तयांचे जिणे श्वानवत् हीन झाले ।।४९।।
इतिहास वाचा मिळे दिव्यदृष्टी ।
ना वाचता राष्ट्र हे दु:खी कष्टी ।। जशी दिव्य दृष्टी मिळे संजयाला । तशी दृष्टी लाभो उभ्या भारताला ।।५०।।
नभासारखे चित्त देई विशाल ।
तसे जान्हवी सारखे शुद्ध शील ।। रवि सारखी बुद्धी तेजस्वी देई । प्रभु! मागणे अन्य ते काही नाही ॥ आई !मागणे अन्य ते काही नाही।।५१।।
कांचन मृगास बघुनी जरी का भूलाल।
सीते समान चटके जगीं अनुभवाल।। यमुना जळात वसती नित कालीयाची। जाणोनी निश्चिती करा जळीं पोहण्याची।।
पायातलें दगड ना कधीं दृश्यमान।
कळसाहुनीं नच कुणा अति उच्चस्थान।। हें राष्ट्रमंदीर चला उभवूं गतीनें। मात्र्यर्थ त्याग करुनी विरुं या धृतीनें ।।
श्री तुळजाभवानी प्रसन्न
मोहीम २००९
श्रीरोहिडेश्वर ते श्रीरायरेश्वर मार्गें पुण्यश्लोक श्रीकान्होजीराव जेधे व नरवीर श्रीजीवाजीराव महाले समाधी.
मोहिमेचे श्लोक
जरी मर्त्य देह त्यजुनी शिवबा दिवंगत्।
त्यांच्या अमर्त्य मनिषा असती भुवंगत्।। त्या सर्व पूर्ण करण्यास्तव झुंझणार। हिंन्दवी स्वराज्य जगतीं आम्ही निर्मिणार।।१।।
जाळूनी क्लैब्य क्षणी घ्या करी खड्गधारा।
सूडानी पेटूनी उठा रणीं म्लेंच्छ मारा।। अटकेपल्याड वधता यवनाधमांना। आई सुखेल भगवा ध्वज फडकताना।।२।।
होत्या अनंत आपदा जरी भोवताली।
संभाजी धर्म जगले रणीं धैर्यशाली।। संदेह भीती कधींना शिवली मनाला। जगदंब आशिष तसा तव दे आम्हाला।।३।।
उठू देत लक्ष रिपूना अमुच्या विरुद्ध।
करण्यास नष्ट सगळें आम्ही नित्य सिद्ध।। संभाजी काली शिवबा असतां उरांत। दुर्दांत राष्ट्र भगवे करू संगरात।।४।।
श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान
श्री तुळजाभवानी प्रसन्न
मोहिम २००८
"श्रीकोराईगड तें श्रीरायगड मार्गें श्रीकोकणदिवा"
मोहिमचे श्लोक
स्वातंत्र्ययुध्द लढले शिवबा अखंड।
निर्मुनी भीषण महा रणयज्ञकुंड।। मी मी म्हणुनी पडली आहुती कितींची। ती तहान भूक आमुच्या हि आहे उरांची ।।१।।
हिन्दवी स्वराज्य करण्या लढले अपार।
निर्धार वज्र करुनीं मन धारदार।। रणीं लोळवूनी वधलें अगणीत खान। शिवसिंहवृत्तीकृतीनें करूं राष्ट्र महान।।२।।
शिवबा समान स्फुरण्यां उरीं राष्ट्रभाव।
तृणवत् जीवित्व समजूं त्यजू देहभाव।। संभाजी छत्रपतीवत् आम्ही धर्मवीर। राष्ट्रार्थ म्लेंच्छ वधण्या रणीं झुंजणार।।३।।
शत्रू असंख्य उठलें अति नीच क्रूर।
शिवबा कधीं न कचलें करण्या प्रहार।। ते धैर्य साहस,लढाऊ,चढाऊबाणा। दे अंबे!खड्ग वधण्यां यवनाधमाना।।४।।
श्री शिवप्रतिष्ठान, हिन्दुस्थान
मोहीम २००१
श्रीमुडागड तें श्रीगगनगड मार्गें पडसाली
मोहीमेचे श्लोक
अंधार स्पर्शु शकतो कधी ना रवीला।
शिवसूर्य चित्ती अमुच्या म्हणुनी आम्हाला। हे हिन्दुराष्ट्र करण्यास स्वयंप्रकाश। चालु उरांत धरुनी शिवसूर्यध्यास।।१।।
अंधार विश्वभरचा गिळणार आम्ही।
राहणार सूर्य बनूनी चीरकाल व्योमी। उजळावयास जगतास जळावयाचे। हे ब्रीद जीवनी जगु आम्ही हिंदुतेचे।।२।।
निर्धार वज्र जरी का पथ चालण्याचा।
संकल्पसिद्धिस्तवही तनु झोकण्याचा। त्यांना न रोधु शकतो कधीही कृतांत। शिवसूर्य सांगती स्वतः अनुभूत सत्य।।३।।
भंगेल धरणी शतधा नभ कोसळेल।
ग्रहगोल भग्न बनूनी रवि काजळेल। उदधि अटेल नगराजही विरघळेल। शिवसूर्यपाईक परी व्रत ना त्यजेल।।४।।
*श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान*
श्री तुळजाभवानी प्रसन्न
मोहीम २००२
श्रीवढु बुद्रुक तें श्रीरायगड मार्गे श्रीसिंहगड
मोहीमेचे श्लोक
खड्गा हुनीही करण्या मन धारदार।
भाल्याहुनी बनण्या मन टोकदार। वज्राहुनी ही घडण्या मन हे कठोर। धर्मार्थ प्राशन करू शिवपुत्रसार।।१।।
जळल्या विना न उजळें जगतांत काहीं।
मातींत बीज कणिसास्तव नष्ट होई।। झिजताच सौरभ सुटे खलु चंदनाचा। संभाजीमार्ग अमुचा ही समर्पणाचा।।२।।
लाचार होउनी कधीं कधीं ना जगावें।
त्याहुनी वीष गिळुनी त्वरया मरावें।। शिवसिंहसदृश बनू अति स्वाभीमानी। संभाजी नाही झुकले यमयातनांनी।।३।।
श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान
श्री तुळजाभवानी प्रसन्न
मोहीम २००३
श्रीलालमहाल तें श्रीलोहगड मार्गें श्री भंडारागड, श्री विसापुर
मोहीमेचे श्लोक
विसरु कसें कधीं आम्ही "शिवबा-व्रताला"।
सोडू कधीं न कधींही धरिल्या पथाला।। शिवसूर्य चित्तीं तळपे नित अस्तहीन। प्राणा समान अमुच्या उरीं राष्ट्रध्यान।।१।।
मृत्यूजिभेवरीं जिणें जगलें अखंड।
उध्वस्त नष्ट करण्या रणीं म्लेंच्छबंड।। शिवसिंहसदृश करू अवघा स्वदेश। हिन्दुत्व शत्रु सगळे करूं नामशेष।।२।।
विघ्ने असंख्य जरींही पथ चालताना।
घालू न भीक कधींही यमयातनांना।। धर्मार्थ आयु बलिदान करूं सहर्ष। "संभाजी,बाजी,शिवबा" रविवत् आदर्श।।३।।
*श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान*
श्री तुळजाभवानी प्रसन्न
मोहीम २००५
श्रीवसंतगड तें श्रीसप्तर्षीगड मार्गें श्रीसज्जनगड
मोहीमेचे श्लोक
शत्रू असंख्य असले तरी ना डरावे।
एकेक गाठुनी रणी टिचूनी वधावे।। मागे कधी न फिरणे शिवपाईकांनी। आज्ञापिले रणी आम्हां शिवभूपतींनी ।।१।।
गिळण्यास प्राण उठला जरीं ही कृतांत।
संभाजी धर्म जगले जळत्या रणांत।। सूर्याहुनी ही अति दाहक धर्मभक्ती। स्फुरण्यास नित्य धरुया शिवपुत्र चित्तीं।।२।।
भीतीपुढें झुकु नका पथ ताठ चाला।
जय जय भवानी शिवबा रणमंत्र बोला।। विजयी रणांत करण्या भगव्या ध्वजास। हृदयांत साठवूं सदा शिवभूपतींस।।३।।
*श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान*
श्री तुळजाभवानी प्रसन्न
मोहीम २००६
श्रीकुणकेश्वर तें श्रीविजयदुर्ग मार्गें श्रीदेवगड
मोहीमेचे श्लोक
मारावयास जरी खान असंख्य आले।
शिवबा अकंपित असे वधण्यास गेले।। मारुनी खान अवघे शिवबा अजिंक्य। 'शिवतेज' देईल आम्हा रणचंडी एक।।१।।
डोळ्यांत दृष्टी अमुच्या शिवशार्दूलाची।
चित्तांत वृत्ती निवसें सईच्या सुताची।। हृदयांत मूर्तीं विलसें प्रिय मायभूची। आतूर हाक श्रवण्यां वढुरायगडची।।२।।
व्याकुळ चित्त अमुचे तव दर्शनार्थ।
आशीष देई जननी बनण्या कृतार्थ।। झुंझार राष्ट्र करण्या अवघ्या जगांत। जगदंब वास कर तूं अमुच्या उरांत।।३।।
*श्री शिवप्रतिष्ठान हिन्दुस्थान*
श्री तुळजाभवानी प्रसन्न
मोहीम २००७
श्रीवढु बुद्रुक तें श्रीरायगड मार्गें श्री सिंहगड
मोहीमेचे श्लोक
भगव्या ध्वजास्तव लढूं रणीं शत्रू मारू।
झुंझोनी लाख समरें आम्हीं धर्म तारु।। खाली न खड्ग कधींही कधीं ठेवणार। शिवपुत्र पाईक आम्हीं जग जिंकणार।।१।।
रिपूशोणितानी अभिषेक करूं धरेला।
अरिमुंड वाहुनी पुजूं आम्ही मातृभूला।। ही आस निर्मू अवघ्या जनसागरात।
हा ध्यास निर्मू अवघ्या जनसागरात।
हिंदुत्वशत्रु सगळे करू भस्मसात।।२।।
गगनाहुनीहि मन उंच विशाल व्हाया।
गंगेहुनीहि मन शुद्ध पवित्र व्हाया।। रविचंद्रवत् मन ज्वलंत प्रसन्न व्हाया। राष्ट्रार्थ आशिष असो तव मूळमाया।।३।।
लाप: ० मिनिटांपूर्वी
तपशील
|