भिडे गुरुजींचे विचार

रविवारी भिडे गुरुजींची सभा दादरच्या विठ्ठल मंदिरात झाली . भिडे गुरुजींनी अनेक मौलिक विचार सांगितले.. भिडे गुरुजींनी सांगितले जो पर्यंत मराठ्यांच्या मनात शिवाजी आणि संभाजी जागृत होते तो पर्यंत महाराष्ट्राची संपूर्ण देशावर सत्ता होती. जेव्हा मराठे शिवाजी आणि संभाजी महाराजांना विसरले ..आणि त्यांच्या अधःपतनाला सुरुवात झाली . पानिपतची लढाई झाली . मराठे त्वेषाने लढले . पानिपतच्या पराजयानंतरहि मराठ्यांनी देशाच्या राजकारणावर पुन्हा पकड मिळवली . त्या हरामखोर अहमद शाह अब्दाली ला सामोरे फक्त आणि फक्त महाराष्ट्रातील मराठेच गेले. उत्तर भारतातील शीख , गुरखा , जाठ्ह , राजपूत , बुंदेले इत्यादी समाजातील आपापल्या बिळात उन्दरासारखे लपून बसले होते .. आणि हेच लोक आजकाल मराठ्यांना देशभक्तीचे उपदेश देतात. अरे जा ... भारताचा इतिहास चाळून बघा .. मराठे हे आधीपासून देशाचाच विचार करत आले. नंतर आपला ... मराठ्यांच्या या शौर्याला , या त्यांच्या गुणाला इंग्रजांनीच वापरायचे ठरवले ... अनेक आमिषे दाखवून मराठ्यांचीच भरती आपल्या सैन्यात केली .. इसवी सन १७६८ मध्ये " मराठा लाईट इंफंत्री " ची स्थापना महाराष्ट्रात झाली .वास्तविक पाहता इसवी सन १७५७ मध्ये प्लासीच्या लढाईपासून इंग्रजांचे राज्य कलकत्यात स्थापन झाले . पण त्यांनी सैन्य भरती केली ती महाराष्ट्रात. हे कसे झाले ??? महाराष्ट्राच्या हातून हे देशद्रोहाचे पातक कसे काय घडले ? एकीकडे मराठे अटकेपार झेंडे लावत... पूर्ण देशावर मराठ्यांचा वचक होता आणि दुसरी कडे मराठे शत्रूचे राज्य वाढावे म्हणून आपल्या शौर्याचा वापर करत होते.. का असे झाले ?? समई तील तेल जसे हळू हळू संपत जाऊन दिवा विझतो तसेच मराठ्यांच्या मनातील शिवाजी आणि संभाजी यांच्या विचारांची ज्योत विझत चालली होती . मराठे महाराजांना विसरत जाऊन पोटार्थी बनत चालले होते ...एकेकाळी देव , देश आणि धर्मासाठी प्राण हाती घेणारे मराठे संवेदनहीन बनले होते ..खरेतर मनुष्य आणि प्राणी यांच्यात काही फरक जर असेल तर तो धर्मामुळेच असतो . जेव्हा माणूस पोटार्थी बनतो. तेव्हा तो दोन पायांचा शेपूट नसलेला पशु बनतो . कारण "भूक , भय , निद्रा आणि मैथून " या पशूंच्या गुणांप्रमाणे माणूस हि तसेच वागायला लागला तर माणसात आणि पशुत काहीही फरक उरत नाही .. महाराष्ट्रात जर हि अशी स्थिती होती ..तर त्यावेळी इतर राज्यांचे तर विचारायलाच नको ..... भारतातील इंग्रजांनी राणीकडे फक्त सैन्य भरतीवर हवा तेवढा पैसा खर्च करण्याची परवानगी मागितली ...इथे पैशांनी माणसे हि विकत घेउ शकतो, देशप्रेमाला इथे काहीही स्थान नाही , असे बरोबर राणीला समजावले. अशाप्रकारे इंग्रजांनी मराठ्यांना भरती करून हिंदुस्थानातील एकेक राज्य घेण्यास सुरुवात केली . आणि हळू हळू १८१८ मध्ये मराठ्यांचा पाडाव झाल्या नंतर संपूर्ण हिंदूस्थानावर इंग्रजांचे प्रभुत्व प्रस्थापित झाले...हे सारे होत असताना महाराष्ट्रात राम विरुद्ध लक्ष्मण , भीम विरुद्ध अर्जुन अशीच स्थिती होती...आसेतु हिमाचल संपूर्ण भारतावर इंग्रजांचे राज्य स्थापन झाल्यावर इंग्लंड वरून लौर्ड एलफिस्टन याला अनेक अभिनंदन पर पत्रे येउ लागली . त्यावेळी त्याने आपली डायरीत लिहिले कि कि मी हा सारा मुलुख फिरलोय, एवढा दुर्गम प्रदेश , एवढी लढवय्यी माणसे आमच्याकडून जिंकली गेलीच कशी ? आमची ती योग्यता कधीच नव्हती ...कदाचित हा ईश्वर खरोखर पक्षपाती असावा ..कारण ज्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नाही असे साम्राज्य निर्माण करायला १८ वे शतक लागले ...शिवाजी सारखा राजा जर आमच्या भूमीत जन्माला आला असता तर हे आम्ही तेराव्या शतकातच पूर्ण केले असते . हि पृथ्वीच काय तर परग्रहावरही आमचे साम्राज्य निर्माण झाले असते... पूर्वी लष्करी अधिकाऱ्यांच्या प्रत्येक वर्षीच्या दैनंदिनी लिहून त्या सबमिट कराव्या लागत ..त्या लौर्ड एलफिस्टन च्या डायरी वर दैनिक भास्कर मध्ये एक लेख आला होता..त्यातील हा आमचा देशद्रोहाचा वृत्तांत ...खरोखर आम्ही महाराजांना "नफ्याचे साधन " म्हणून वापरून घेतले ..कधी सत्तेसाठी , तर कधी मोठेपणासाठी .....
महाराजांना आम्ही स्वीकारले ते फक्त पुतळ्याच्या स्वरूपात ..विचाराच्या स्वरूपात नाही ...हाडामासाचा देह म्हणजे का माणूस ??माणूस म्हणजे त्याचे विचार ...होय ..ते विचार जिवंत होते तो पर्यंत आणि तोपर्यंतच महाराष्ट्र जिवंत होता..मराठे जिवंत होते. जेव्हा महाराष्ट्र शिवरायांना विसरला , संभाजी महाराजांना विसरला तेव्हाच महाराष्ट्राची अधोगती सुरु झाली ...शिवाजी महाराज जेव्हा जन्माला आले त्यावेळी परिस्थिती काय होती ? सारा देश हिरव्या किडीने ग्रासला होता.. एकही हिंदू राज्य अस्तित्वात नव्हते ...मध्य प्रदेशात जे काही डोंगराळ भागात गोंडांचे जे काही राज्य होते ते देखील शहाजहान ने संपवून टाकले होते..... ज्या राणा प्रताप ने मुघल साम्राज्याशी कडवी झुंज दिली त्या महाराणा प्रताप चे वंशज मुघलांची चाकरी करण्यात समाधान मानत होते ..राजपूत लोक तर स्वताचे संस्थान वाचवण्यासाठी स्वताच्या मुली-बाळी सुलतानाच्या जनानखान्यात देत होत्या.. स्वाभिमान सारखे शब्द काही उरलेच नव्हते ..गावांची नावे बदलत होती...भाषेत परकीय शब्द येत होते..इस्लाम पूर्णपणे घरात घुसला होता..परिस्थिती पूर्ण विरुद्ध होती..आणि महाराष्ट्रात मोरे, शिर्के, दळवी , राणे, महाडिक, निम्बाळकर , मोहिते, वगैरे घराण्यांची बांद्गुळांसारखी छोट्या छोट्या सत्ता उदयास आल्या होत्या ...या सार्या सत्ता मुस्लीम सुल्तानांकडून आईवर आणि गाईवर हात टाकला तरी शांत कसे राहायचे हा शांततेचा पाठच जणू शिकत होते....आपले कोण आणि परके कोण हेच काळात नव्हते ..तालीकोट च्या लढाईत विजयनगरच्या साम्राज्याचा पराभव संपला होता....यादवी साम्राज्य संपले होते....यादवांचे वंशज मुसलमानाचे नोकर बनले होते ..शिव जन्मापूर्वी शहाजी महाराजांचे स्वराज्याचे प्रयत्न फसले होते ..अशा वेळी राजांकडे काय होते ?? मावळ्यांनी तरी अशी काय मदत महाराजांना केली ?महाराजांकडे होता तो फक्त विश्वास " "विश्वास स्वतःवरचा आणि स्वताच्या माणसांवर "...आणि मावळ्यांचा विश्वास राजांवर .....हीच काय ती संपत्ती होती ......महाराष्ट्राकडे .......त्याबळावर महाराष्ट्राने स्वराज्य स्थापन केले....
शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांच्या तेजस्वी बलिदानानंतर महाराष्ट्रात ना राजा होता ना राज्य....संभाजी पुत्र शाहू मुघलांच्या कैदेत , राजारामांनी राजधानी जिंजीला हलवली होती ..महाराष्ट्रात काय होते तेव्हा ??होते.. होते ..ते शिवरायांचे विचार...धर्मवीर संभाजीची धर्माविषयीची अमोघ निष्ठा ....त्या बळावर २७ वर्षे महाराष्ट्र झुंजत होता....मराठी साम्राज्य नष्ट करावे या हेतूने महाराष्ट्रात आलेल्या औरंगाझेबाचे थडगे मराठ्यांनी नंतर महाराष्ट्रातच बांधले ..आणि नंतर या शिवरायांच्या वारसांनी मागे वळून बघितले नाही ..आणि मराठ्यांचे घोडे अटकेपार जाउ लागले ... भगवान श्रीकृष्णाची द्वारका जशी बुडाली तसीच हे मराठी साम्राज्य १८१८ मध्ये बुडाले आणि तेही शिवरायांचे विचार सोडून दिल्यामुळेच .....आणि आम्ही शिवरायांना विसरलो ..किती विसरलो ?? आम्ही हरलो त्यावेळी आमच्या खांद्यावर शिवरायांचा , हिंदूंचा भगवा झेंडा होता ...आणि आम्ही ते मराठे गांधींच्या अहिंसेला भुललो ...ते सांगतील ते पूर्व दिशा मानायला लागलो.....हिरवी पिलावळ पोसायला लागलो .
सिंह माने नेता सशाला |
वाघ माने नेता अजाला |
शिवाजी सोडून पूजती गांधीजीला |
मराठे असे कसे भुलले षंढतेला ||
आईच्या गर्भात असतानाच ज्यांचे तलवारीशी लगीन लागते असे आम्ही मराठे भगव्याला विसरलो ,,,झुंजाराची रीत विसरलो ... भगवा टाकला आणि गांधींचा तिरंगा हाती घेतला ...जो भगवा शिवाजी राजांनी ईश्वरी राज्य व्हावे ह्या इच्छेने हाती घेतला तो भगवा...ज्या भगव्या ध्वजासाठी कित्येक मावळे खर्ची पडले... भगवा पडू नये म्हणून कित्येकांनी आपले प्राण दिले आणि तो भगवा आम्ही विसरलो . भगवा आम्ही नंतर केवळ स्वार्थासाठी वापरला... तो फक्त मंदिरांवर लावतो ...आणि तो सोडून आमच्या पूर्वजांनी कधीच न बघितलेल्या तिरंगी झेंड्याला खांद्यावर घेउन नाचायला लागलो ..आणि मावळ्यांनी केलेल्या बलिदानाचा अपमान केला ...भगव्याची आम्हाला ऐलार्जी झाली ...कोणी हि काहीही म्हणो हे हिंदू राष्ट्रच आहे .सध्या जरी हे धर्मनिरपेक्ष देश म्हणून गणले जातेय कारण अजूनही या देशात हिंदू बहुसंख्य आहेत. उद्या मुस्लीम बहुसंख्य हे राष्ट्र झाले कि सेक्युलर ते चे वारे देखील उरणार नाही .
शिवाजीरुपी संभाजी रुपी विचारांचे अमृत जो पर्यंत पीत नाही तो पर्यंत हा देश मृतवतच राहील ..
महाराष्ट्राच्या कलेवरामध्ये श्वास पेरला कोणी ..
गलितगात्र या महाराष्ट्राला घास भरवले कोणी
राष्ट्रप्रेम , अभिमान ,अस्मिता चैतन्याची किमया
महाराष्ट्राच्या अंतरात मधुहास्य फुलवले कोणी
कोण अशी ती विभूती ? कोण अशी ती विभूती ?
शिवछत्रपती .....शिवछत्रपती
राजाशिवछत्रपती ...